Breaking News

गर्भलिंग निंदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हवी - अँड. वारुंजीकर


अहमदनगर  - प्रसूतीपूर्व गर्भलिंग निंदान प्रतिबंधक कायद्याची (पीसीपीएडीटी) प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अंमलबजावणी यंत्रणा, समुचित प्राधिकारी यांनी स्वताहून पुढाकार घेतला पाहिजे. या कायद्याचीप्रभावी अंमलबजावणी म्हणजे गर्भातील एका जीवाला जीवदान देणे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ उदय वारुंजीकर यांनी केले.
येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पीसीपीएनडीटी कार्यशाळा आयोजित कऱण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळीजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.टी. गाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.बी. बेलंबे, डॉ. डी.टी. धोंडे, सल्लागार समितीचे सदस्य शैलजा निसळ, डॉ. अनिल कुऱ्हाडे, गणेश बोऱ्हाडे, डॉ. सी.डी. मिश्रा, डॉ. राजश्री मांढरे,डॉ. धस आदी उपस्थित होते.

यावेळी अँड. वारुंजीकर म्हणाले, गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा कायदा आहे. या कायद्याने समुचित प्राधिकाऱ्यांना खूप मोठे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. गर्भलिंगनिदानालाप्रतिबंध तसेच त्याचे नियमन करणे आणि सोनोग्राफी मशीन्स चालवणाऱ्या रेडिओलॉजिस्टनी अथवा संबंधित तंत्रज्ञांनी त्यांना दिलेल्या विहित चौकटीतच काम कऱणे आवश्यक आहे. तसे काम होते की नाही, हे पाहण्याचीजबाबदारी समुचित प्राधिकाऱ्यांची असल्याचे त्यांनी नमूद केले.या कायद्यान्वये समुचित प्राधिकार्यास विविध कलमांनुसार यासंदर्भातील कागदपत्रे दाखल करणे, सर्च वॉरंट जारी कऱण्याचेही अधिकार आहेत.गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी आणि प्रभावी व सक्त अंमलबजावणीसाठी या कायद्याने मोठे अधिकार या तपासणी यंत्रणेला दिल्याचे वारुंजीकर यांनी स्पष्ट केले.