Breaking News

गौणखनिज विभागाची ५० टक्केच वसुली


अहमदनगर :- जिल्हा गौणखनिज कर्म विभागाला मार्च अखेर पर्यंत 92 कोटींची वसुली करावयाची असून आतापर्यंत ४२ कोटींची वसुली झाली आहे. अद्यापही ५० कोटींची वसुली बाकी असून मार्च अखेर वसुली उर्वरित वसुली करतानाअधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.

नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आयुक्तांनी आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी गौणखनीज कर्म विभागाला ९२ कोटी वसूली मार्च अखेर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. गौण खनिज प्रशासन विभाग वेळोवेळी ऑनलाईन निविदा काढते परंतु लिलाव विकले जात नाहीत. परंतु अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू आहे. या विरोधात गौण खनिज विभाग सक्रिय झाला असून वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.