Breaking News

नागरिकांनी घेतली प्लास्टिक पिशवी मुक्तीची शपथ

पुणे,  - प्रदूषण रोखण्यासाठी योग्य व्यवस्थापन न केल्यास भविष्यात प्रदूषणाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल. त्यासाठी प्लास्टिकमुक्त प्रभाग क रण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे आवाहन स्थानिक नगरसेवक संदीप कस्पटे यांनी केले. प्लास्टिक पिशवीमुक्त जनजागृती अभियान प्रसंगी ते बोलत होते.


पिंपळेनिलख येथील कै. मारुती गेनबा कस्पटे मनपा शाळेत कस्पटेवस्ती ज्येष्ठ नागरिक संघ, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग फेडरेशन, कस्पटेवस्ती व्यापारी असोसिएशन, सिजा फाउंडेशन, महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थितांनी प्लास्टिक पिशवी मुक्तीची शपथ घेतली. नागरिकांनी परिसरातील प्रत्येक दुकानात जाऊन प्लास्टिक पिशवी मुक्ती संदर्भातील पत्रक वाटून जनजागृती केली. प्रास्ताविक अरुण देशमुख यांनी केले संयोजन प्रभाग अध्यक्ष प्रसाद कस्पटे , विलास कुटे, यांनी केले. आभार राम लाभे यांनी मानले.