Breaking News

वेळ आल्यावर मराठी व हिंदूंसाठी नक्कीच ठाम भूमिका घेणार - उद्धव ठाकरे


मुंबई - सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे आहोत. त्यामुळे जेव्हा घ्यायची तेव्हा नक्कीच भूमिका घेणार. मात्र माझ्या स्वार्थासाठी नाही तर वेळ आल्यावर मराठी आणि हिंदूंसाठी ठाम भूमिका घेऊ घेणार, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे येथे केले. परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या महाराष्ट्र राज्य व ृत्तपत्र विक्रेता संघटना व मुंबई वृत्तपत्र संघटना यांच्या एकदिवसीय अधिवेशनात ते बोलत होते.
पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे. न्यायव्यवस्थेला तुमच्याकडे येऊन आपल्या वेदनेला वाचा फोडावी लागते हे या स्तंभाचे महत्व आहे. आजकालच्या राजकारण्यांना फेरीवाला आणि वृत्तपत्र विक्रेता यातला फरक कळायला हवा. शिवसेना वृत्तपत्र विक्रेत्यांसोबत आहे. सुर्य उगवला की सकाळी उजेड पडतो तसेच वृत्तपत्र डोक्यात प्रकाश पाडते. त्यामुळे पत्रकारांइतकेच ते घरोघरी पोहोचवणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्यांचेही तितकेच महत्व आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेल्या मार्मिकची क्रांती घरोघरी पोहोचवण्याचे काम या त्यावेळच्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले. बाळासाहेबांनी सुरू केलेल्या लढ्यात खांद्याला खांदा लावून लढल्याबद्दल विक्रेत्यांचे विशेष कौतुक, असे म्हणत ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आवाज दणदणीत असूनही तो कोण दाबत आहे, असा टोलाही ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.