कंटेनरला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी
पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार प्रदीप पवार कंटेनर (क्र. एमएच 46 - एएफ 8106) घेऊन गोव्याहून मुंबईकडे निघाला होता. तो तळेकांटे येथील सप्तलिंगी पुलाजवळ आला असता चिपळूणकडून रत्नागिरीकडे जाणार्या मोटारसायकलने (क्र. एमएच 08 एएल - 2267) कंटेनरच्या उजव्या बाजूला मागील टायरजवळ धडक दिली. मोटरसायकल अनिकेत शिवलकर (35, रत्नागिरी) चालवत होता. या अपघातात अनिकेत गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची खबर समजताच नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने अनिकेतला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले. अपघाताची नोंद देवरूख पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
