Breaking News

नान्नजच्या वनराईतील हजारो वृक्षाची वृक्षतोड


जामखेड/ ता.प्रतिनिधी/ - जामखेड तालुक्यारील नान्नज गावाच्या पश्चिमेस असणाऱ्या गट नं 1063 मधील वन खात्याच्या वनराईतील हजारो वृक्षाची वृक्ष तोड झाली असुन वृक्षतोडीस वनविभागच जबाबदार आहे . तर या संदर्भात वन विभागाच्या विरोधांत आंदोलन करण्याचा नान्नज व परिसरातील नागरिकाचा इशारा सरकार झाडे लावा झाडे जगवा असे सांगते. वृक्ष लागवडीवर लाखो रूपये खर्च केले जातात. प्रत्येकाला वृक्षाचे महत्व समजावे. यासाठी वेगवेगळे उपाय योजनाचा अवलंब केला जातो. तसेच शालेय विद्यार्थांपासुन ते सरकारी अधिकारी कर्मचारी यांना वृक्ष लागवडीचे अथवा संगोपनाचे उदिष्ट ठरवुन दिले जाते, नव्हे ते करवुनच घेतले जाते. अन्यथा कसुर करणाऱ्यावर कारवाईही केली जाते. त्याचप्रमाणे निसर्गचा समतोल राखण्यासाठी वृक्षाची लागवड व संगोपन होणे गरजेचे असते. असा सरकारचा फतवा आहे. पण असे असताना देखील आपली वृक्ष रक्षणाची जबाबदारी सोडुन वृक्ष रक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने जामखेड तालुक्यातील नान्नज गावच्या पश्चिमेस आसणाऱ्या गट नं 1063 मधील एकुण 90 हैक्टर मधील वृक्षाची रोज बेसुमार वृक्षतोड होत आहे. तसेच या जंगलाचा अनेक गोष्टी साठी दुरुपयोग केला जात असुन, येथे कोणीही वनकर्मचारी येतच नसल्याने या वृक्ष वनराई मध्ये अनेक अनैतिक  गोष्टीही घडताना दिसतात. तसेच चुकीच्या गोष्टीसाठी सुधा या वन विभागाचा वापर केला जात आहे. तसेच वाढीस लागलेल्या अनेक वृक्षाची मुळापासुन कत्तल केलेली, तसेच वृक्षाच्या फांदया मोडून तोडून सर्वत्र नाश केल्याचे दिसते. रोज जळतनासाठी येथून सर्रास वृक्ष तोडून नेले जातात. ही सर्व अतोनात हानी गेल्या कित्येक दिवसापासुन चालु आहे. मात्र या सर्व गोष्टीकडे वनखाते जाणून - बुजुन दुर्लक्ष करत आहे. या संदर्भात स्थानीकांनी हे सर्व प्रकार वन खात्याच्या निदर्शनास आनुन दिले. तरीही मात्र अजुनही वनकर्मचारी अथवा वनविभाग लक्ष देत नसल्याने रोज शेकडो वृक्ष भुईसपाट होत असुन शासनाच्या वृक्ष लागवडीच्या उद्देशाला वनविभागाकडून हरताळ फसल्या जात आहे अशा कामचुकार वनकर्मचाऱ्यांवर त्वरीत कारवाई व्हावी . अन्यथा त्याविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील स्थानीक नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.