दिगंबर जैन सरपंचपदी चंद्रकांत कासलीवाल व संतोश गंगवाल
कोपरगांव प्रतिनिधी :- दिगंबर जैन समाजाच्या सरपंचपदी येथील वृत्तपत्र छायाचित्रकार चंद्रकांत षांतीलाल कासलीवाल व संतोश कांतीलाल गंगवाल यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचा आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सत्कार केला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे गटनेते रविंद्र पाठक भाजपा तालुकाध्यक्ष षरद थोरात नगरसेवक स्वप्नील निखाडे विजय कासलीवाल मुन्ना पाटणी आदि उपस्थित होते. आमदार स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणांल्या की जैन समाजात सरपंचपदाला विषेश मान आहे.
त्यांच्या अखत्यारीत विविध कार्यक्रम साजरे करण्यांबाबतचे नियोजन होवुन त्याप्रमाणे कार्यवाही होत असते जैन समाजाच्या अडी अडचणी सोडविण्यांसाठी आपण सर्वतोपरी मदत करू अषी ग्वाही आमदार कोल्हे यांनी यावेळी बोलतांना दिली. चंद्रकांत कासलीवाल व संतोश गंगवाल यांनी समाजासाठी आजवर केलेल्या कामाची उतराई म्हणून दिगंबर जैन समाजाच्या विषेश वार्शीक बैठकीत सर्वानुमते निवड केली ही समाजाच्या दृश्टींने हितावह बाब आहे. त्यांच्या हातुन समाजकार्य घडो अषा षुभेच्छा त्यांनी दिल्या. सत्कारास उत्तर देतांना चंद्रकांत कासलीवाल व संतोश गंगवाल म्हणांले की दिगंबर जैन समाजाने ज्या विष्वासांने आपल्यावर सरपंचपदाची जबाबदारी टाकली ती पुर्ण करू.
