Breaking News

गणित विज्ञान प्रदर्शनातील पारितोषिकांचे वाटप


नगर ता.प्रतिनिधी :तालुक्यातील रूईछत्तीशी येथे भरविण्यात आलेल्या गणित विज्ञान प्रदर्शनात वाळकी येथील न्यू इंग्लिश स्कूल कला, कनिष्ठ, विज्ञान महाविद्यालयास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पंचायत समिती नगर व गणित विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रुईछत्तीशी येथे गणित विज्ञान प्रदर्शन भरविण्यात अiले होते. वाळकी विद्यालयातील विज्ञान शाखेचा वैभव मोढवे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या ‘ शेतीला पाणी देणारे स्वयंचलित यंत्र’ या उपकरणाला द्वितीय क्रमांक मिळाला.पं. समितीचे सभापती रामदास भोर, बाळासाहेब हराळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. मोढवे याला विज्ञान शिक्षक माया सुंबे, शीतल रहाणे, कविता शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभले .या यशाबद्दल प्राचार्य सुभाष बनकर, पर्यवेक्षक भागचंद कोकाटे, अरुण कदम यांनी विद्यार्थाचे अभिनंदन केले.