Breaking News

ताईसाहेब वादविवाद करंडक शेवगावच्या ‘न्यू आर्ट्स’कडे


सोनई प्रतिनिधी :- येथील मूळा एज्युकेशनच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संपन्न झालेल्या श्रीमती ताईसाहेब कदम राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेचा करंडक शेवगावच्या न्यू, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या संघाने पटकाविला. या स्पर्धा गेल्या २० वर्षांपासून आयोजित केल्या जातात. चालू वर्षी या स्पर्धेसाठी प्रचलित धोरणे, शेती विकासास मारक आहेत की नाहीत, असा विषय या वाद विवाद स्पर्धेसाठी ठेवण्यात आला होता. स्पर्धेचे उदघाटन प्रा. शंकर लावरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्पर्धा समितीचे कार्याध्यक्ष डॉ. ज्ञानदेव झिने यांनी प्रास्ताविक केले. परीक्षक म्हणून प्रा. अशोक पवार, डॉ. नवनाथ शिंदे यांनी काम पाहिले.