ज्योतिषाने घेतला पढेगावकरांना हजारोंचा गंडा
कोपरगाव ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील पढेगांव येथे एस. जी. साळुंके या भामट्याने कुंडली काढून देण्याच्या उद्देशाने अनेकांना हजारो रुपयांचा गंडा घातला. एक महागड्या मोबाईलसह हजारो रुपये घेऊन त्याने पोबारा केला. या भामट्याचा बीड बायपास, साईनगर, जालना हायवे, औरंगाबाद असा निवासस्थानाचा पत्ता आहे. त्याने अनेकांना हा मो. ८९७५१०९१२१ दिला असून तो बंद आहे. या भामट्याने गावात अनेकांची ३०० रुपये घएऊन कुंडली काढून दिली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार आसल्याचे निवृत्ती दाणे यांनी सांगितले.