Breaking News

शहीद जवान योगेश भदाणेच्या कुटुंबीयांस 1 कोटींची मदत - डॉ. भामरे

धुळे, दि. 21, जानेवारी - जम्मू-काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याने केलेल्या गोळीबारात शहीद झालेला जवान योगेश मुरलीधर भदाणे याच्या कुटुंबीयास भारत सरकारच्या वतीने एक कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
जम्मू- काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात योगेश भदाणे (वय 28) हा जवान 13 जानेवारी 2018 रोजी शहीद झाला. त्याच्या पार्थिवावर 15 जानेवारी 2018 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी खलाणे, ता. शिंदखेडा येथे जावून भदाणे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी ते बोलत होते.



यावेळी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, तहसीलदार सुदाम महाजन, रामदास पाटील, संजीवनी शिसोदे, प्रा. अरविंद जाधव, खलाणेचे सरपंच भटू वाघ यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले, शहीद योगेश भदाणे अमर झाला आहे. त्याचा आम्हासर्वांना अभिमान आहे. शहीद जवान योगेश भदाणेच्या कुटुंबीयांच्या पाठिमागे भारत सरकार खंबीरपणे उभे आहे. देशाचे संरक्षण करण्यास जवान खंबीर आहेत. एकाही जवानाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
भारत सरकारच्या माध्यमातून योगेशच्या कुटुंबीयांस 1 कोटी 1 लाख 25 हजार 967 रुपयांचा निधी टप्प्या-टप्प्याने लवकरच त्यांच्या थेट बँकखात्यात जमा करण्यात येईल. तर त्यांच्या कुटूंबियास लिबरल पेन्शन योजना मंजूर करण्यात येईल. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकास नोकरीत समाविष्ट करण्याचे देखील प्रयोजन असल्याचे त्यांनी यावेळी सां गितले