Breaking News

जिल्ह्यात चार हजार विद्यर्थ्यांचे शिष्‍यवृत्‍ती अर्ज प्रलंबित


अहमदनगर :- अनुसूचित जातींसाठी असणारी भारत सरकारची शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा फी या योजनेंसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सन २०१५ -१६ व सन २०१६ -१७ या वर्षासाठीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश समाज कल्याण आयुक्तालयाच्या वतीने सर्व महाविद्यालयांना देण्यात आले होते. परंतु सद्यस्थिती पाहता अद्यापही ४ हजार १५२ विद्यर्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत.

सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन स्थिती तपासून जे अर्ज अद्यापही ऑनलाईन मंजूर करण्‍यात आलेले नाहीत. त्‍यांचे बी स्‍टेटमेंट, अर्ज विहित हमीपत्रासह कार्यालयास त्‍वरीत दिनांक 15 जानेवारी 2018 पर्यत सादर करावयाचे आहेत. पात्र विद्यार्थी जर शिष्‍यवृत्‍ती तसेच शिक्षण फी योजनेचा लाभ घेण्‍यापासून वंचित राहिल्‍यास त्यास महाविद्यालय जबाबदार राहील असे निर्देश समाज कल्याणने दिले आहेत.