प्राथमिक शिक्षकांना 'स्पोकन इंग्लिश'चे प्रशिक्षण
प्राथमिक शिक्षकांना अध्यापन करताना इंग्रजी भाषेचा वापर करावा लागतो.त्यासाठी इंग्रजी भाषेतील विविध कौशल्ये अवगत करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम राबविला जात आहे.शिक्षकांनी ऑनलाईन मागणी केल्यानुसार हे प्रशिक्षण दिले जात आहे . कार्यक्रमासाठी प्रशिक्षकांना लोणावळा येथे प्रशिक्षित करण्यात आले.चापडगावच्या न्यु इंग्लिश स्कूलचे प्रा.प्रमोद तोरडमल तसेच डॉ.जी.डी.सप्तर्षी ज्युनियर कॉलेजचे प्रा.किरण जगताप हे प्रशिक्षण देत आहेत.
प्रशिक्षणात शिक्षकांच्या कृतीयुक्त सहभागातुन विविध भाषिक कौशल्ये विकसित केली जात आहेत. श्रवण कौशल्ये, अध्यापनातील चुकांची दुरुस्ती, बोलण्यातील आत्मविश्वास, प्रश्न कौशल्ये, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर आदी मुद्यांवर आधारित प्रशिक्षण दिले जात आहे. गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक शाहु फाळके यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
