Breaking News

घरफोड्यांसह जबरी गुन्ह्यातील आरोपी शेवगाव पोलिसांच्या जाळ्यात

शेवगाव /प्रतिनिधी ;- घरफोड्या, जबरीचोरी तसेच दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक करण्यात शेवगाव पोलिसांना यश आले असून या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडीस येण्याची शक्यता शेवगाव पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. दि. 18 जानेवारी दु. 3 वा. बाबासाहेब खामकर रा. आपेगांव ता. शेवगाव ते शेवगाव शहरातील शिवाजीनगर भागाकडे दुचाकीवरुन जात असताना त्यांना दोन अज्ञात इसमांनी मारहाण करून खिशातील 5 हजार रुपये काढून घेतले होते. यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, आरोपी शहाजी कर्डिले व बाबासाहेब पाडूरंग कोरडे (रा. शेवगाव) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला, गुन्ह्यात चोरलेली 5 हजारांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. दरम्यान, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात शेवगांव पोलिसांनी संजय चव्हाण (रा. रांजणी) राहूल अडागळे (रा. भेंडा) गणेश भिकनाथ तेलोरे (रा. गणेश नगर ), पंकज सुरेश उर्फ रमेश काळे (रा. हरेगांव), यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून शहरातून चोरी गेलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दुसरी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील या आरोपींचा परस्पर संबंध असण्याची दाट शक्यता असून, त्यादृष्टीने शहर पोलीस निरीक्षक गोविंदा ओमासे पुढील तपास करत आहेत.