Breaking News

गुरव समाज युवा मेळाव्याचे आयोजन


कुळधरण / प्रतिनिधी । राष्ट्रीय गुरव समाज महासंघ व अहमदनगर गुरव समाज मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 28) अहमदनगर येथे युवक तसेच वधुवर सुचक मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती राशीन येथील राष्ट्रीय गुरव महासंघाचे प्रदेश सरचिटणीस व राशीन न्यूज पेपर एजन्सीचे संचालक विशाल रेणुकर यांनी दिली.
अहमदनगर येथील ओम गार्डन येथे पार पडणार्‍या मेळाव्यात हळदी-कुंकू कार्यक्रमासह गुरव समाजातील सामाजिक कार्याचा व लौकिकांचा विविध गुणगौरव सत्कार समारंभाचे नियोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी बुलढाण्याचे माजी आ. विजयराजे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन हभप बाळासाहेब आपेगावकर यांचे हस्ते होणार असुन मेळाव्याला उद्योजक गुंडेराव पावशेरे, अशोक क्षीरसागर, पुण्याचे पोलीस उपायुक्त संतोष पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन, तसेच आ. संग्राम जगताप, सुवर्णा कोतकर, राष्ट्रीय गुरव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव हे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला राज्यातील विविध जिल्ह्यातील गुरव समाजबांधवासह कर्नाटक राज्यातील समाजही हजेरी लावणार आहेत. अहमदनगर गुरव समाज मंडळाच्या वतीने बाळासाहेब क्षीरसागर यांनी बांधवाना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.