Breaking News

देवा फांउडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


शेवगांव /प्रतिनिधी । विविध सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रांमध्ये देवा फाऊंडेशनकडून कायम काहीना-काही सामाजिक मदत चालू असते. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आघाडीत असणार्‍या या फाऊंडेशनकडून 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी जोहरापूर अंतर्गत जिल्हा परिषद शाळा ढोरा वस्ती या शाळेतील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, चॉकलेट, इंग्लिश उजळणी, पाट्या, मराठी उजळणी, खोडरबर, पट्टी, खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका ज्योती खंडागळे/सोनवणे, उपमुख्याध्यापिका सुनिता मगर, अंगणवाडी सेविका मनीषा खेडकर आदींसह शिक्षक हजर होते. हा कार्यक्रम देवा फौंडेशनचे मार्गदर्शन अरुण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला. पप्पू वाघमारे, अंकुश ढाकणे, आदेश हिवाळे, अक्षय खोमणे, प्रेम अंधारे, अमोल तुजारे, श्यामराव कुसळकर, अतुल चाबूकस्वार, विजय बर्वे, लखन कंठाळे, राहुल वरे, रोहित हुशार, विष्णू पाठे, फैय्याज शेख आदी उपस्थित होते.