पणतुर्ली येथील युवक अपघातात ठार
सिंधुदुर्ग, दि. 24, जानेवारी - दोडामार्ग येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असणार्या बारावी कॉमर्समधील पणतुर्ली येथील राघोबा विलास गवस याचा दोडामार्ग सीमेवरील साळ खोलपेवाडी येथील अपघातात मृत्यू झाला. त्याच्यासोबत असणार्या त्याच्या मित्रावर बांबोळी गोवा येथे उपचार सुरू आहेत.
खोलपेवाडी येथील राजा शिवाजी विद्यालयाजवळच्या एका धोकादायक वळणावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्याच दरम्यान समोरून येणार्या दुधाच्या टँकरचे चाक त्याच्या दुचाकीच्या मागच्या चाकावरून गेले. अपघातात राघोबा याच्या दोन्ही पायाला मोठा मार लागला होता. रुग्णवाहिकेत घालताना तो व्यवस्थितपणे बोलत असल्याचे मदतकर्त्यांनी सांगितले. त्याला गोवा म्हापसा येथील रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची बातमी कळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, भगवान गवस, विजय जाधव, परमे सरपंच आनंद नाईक, आदींनी धाव घेतली. राघोबाचा आई वडील, मोठी बहिण, असा परिवार आहे. बुधवारी 24 जानेवारीला राघोबाचा वाढदिवस होता; पण त्याआधीच त्याचे अपघाती निधन झाले.