जखमी सांबराला मिळाले जिवदान
सिंधुदुर्ग, दि. 24, जानेवारी - दोडामार्ग तालुक्यात खोक्रल येथे मंगळवारी तेथील नदीपात्रात जखमी अवस्थेत सांबर आढळून आले. खोक्रलचे सरपंच देवेंद्र शेटकर यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जखमी सांबराला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. वन विभागाच्या कर्मचार्यांनी जखमी सांबारावर उपचार करून जंगलात सोडून दिले. सांबराच्या कान आणि मागच्या पायांना जखमा झाल्याने ते जायबंदी झाले होते.
खोक्रल येथील नदी पात्रात एक जखमी सांबर वेदनेने विव्हळत होते. याची माहिती खोक्रलचे सरपंच देवेंद्र शेटकर यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने जखमी सांबराला बाहेर काढले आणि याची माहिती वनविभागकार्यलयाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळावर पोचले. त्यानंतर त्यांनी जखमी सांबराला साटेली भेडशी येथील पशुवैद्यक ीय दवाखान्यात नेवून त्याचावर उपचार करून पुन्हा जंगलात सोडून दिले. खोक्रल गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. असनिये फुकेरी पासून थेट गोवा विर्डी पर्यंत सह्याद्रीचे घनदाट जंगल आहे. तथापि अन्न-पाण्यासाठी वस्तीच्या दिशेने आलेल्या त्या सांबरावर पाळीव किंवा रानटी कुत्र्यांनी हल्ला केल्याने ते जखमी झाल्याचे मानले जाते.