अमृतवेस नवविचारांची दिशा देईल - पोपटराव पवार.
कौतुकी नदीच्या पात्राजवळ अत्यंत कल्पकतेने लाईव्ह अमृतवेस सोनईकरांनी मा. यशवंतराव गडाख यांना भेट दिली आहे. पोपटराव पवार यांच्या हस्ते फित कापुन वेसचे तसेच बटन दाबुन वेसवर असणा-या मोटेचे उद्घाटन करण्यात आले. सोनई गावात प्रवेश करताच हे प्रवेशद्वार आलेल्या व्यक्तींचे लक्ष वेधुन घेते. अत्यंत सुबक शिल्प या प्रवेशद्वाराचे खास वैशिष्टय आहे. शेतात राबणारे शेतकरी कुटुंब , आधुनिकतेमुळे पडद्याआड गेलेले रहाट, त्यात फिरणारे बैल व मोटधारक मोटकरी, शेतात काम करणारी महिला, खांद्यावर नांगर घेतलेला व गायीचे दुध काढणारा शेतकरी, ऊस व मक्याची शेती, शिक्षण, संगित, पुस्तके, वृक्ष यांसह तालुक्यातील अनेकांच्या प्रपंचातील महत्वाचा घटक असलेला कारखाना या प्रवेशद्वावर दिमाखात झळकत आहे. या प्रसंगी मा. यशवंतराव गडाख यांच्या ‘अर्धविराम’ पुस्तकाच्या 12 व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
व्यासपिठावर मा. यशवंतराव गडाख, शारदाताई गडाख यांच्यासह सर्वश्री शंकरराव गडाख, अरूण शेवते, महादेव कुलकर्णी, बाळ बोठे, सुधीर लंके, ताराचंद म्हस्के, अनिल पाटील, द.वि. अत्रे, टी. एन. परदेशी, अनिरूध्द देवचक्के, शिवाजी शिर्के, विकास अंत्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती .
