Breaking News

पुलांच्या भगदाडाने प्रवाशांचा जीव धोक्यात?


कुळधरण/प्रतिनिधी/- कर्जत तालुक्यातील रस्त्यावरील अनेक पुल खचले असुन भगदाड पडल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. तळवडी- दगडी बारडगाव, नांदगाव रेहेकुरी तसेच इतर रस्त्यांवरील पुलाला मोठमोठे भगदाड पडल्याने त्या रोडने जातांना प्रवाशी जीवघेणा प्रवास करीत आहेत.
दगडी बारडगाव नजिक पुलाला सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाच्या प्रवाहाने बोगदा पडला आहे. त्याची बांधकाम विभागाने अद्यापही दखल घेतली नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे.

नांदगाव-रेहेकुरी डांबरीकरण रस्त्यावर पुलाचे कॉंक्रीटीकरण कोसळल्याने भगदाड आहे. रस्त्याच्या मध्यावर पडल्याने दुचाकी,चारचाकी वाहने रस्त्यात अडत आहेत. चालकांना भगदाड दिसत नसल्याने देखील अपघाताची शक्यता वाढलेली दिसून येत आहे.