Breaking News

पंचायत समितीत ग्रा.पं.सदस्य पायाभूत प्रशिक्षणास प्रारंभ


पारनेर/प्रतिनिधी /- तालुक्यातील सर्व विद्यमान सरपंच, सदस्य यांच्या साठी शासनाच्या वतीने पायाभूत प्रशिक्षणाचे पंचायत समिती सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उदघाटन पंचायत समितीच्या सहा.गटविकास अधिकारी अस्मिता तांबे (धुमाळ )यांच्या शुभहस्ते पार पडले. 

या प्रसंगी पंचायतराज प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रमाकांत गरड, विस्तार अधिकारी आर.डी.अभंग, प्रशिक्षणाचे व्याखाते अशोक सब्बन, संजय देशमुख, सञसंचालक गंगागीर गिरी, जयश्री घाडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

उदघाटन प्रसंगी तांबे म्हणाल्या की, विद्यमान सरपंच, सदस्यांनी चौदाव्या वित्त आयोगाची माहीती करुन घेणे जरुरीचे आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या हक्काच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. ग्रामसभेला प्राप्त निधी विनियोगाच्या अधिकारानुसार ग्रामविकासाची कामे राबविली पाहीजेत. तसेच पाणी फौंडेशनची संकल्पना प्रत्येक गाव पातळीवर राबविली पाहीजे. हे प्रशिक्षण पंचायतराज प्रशिक्षण संस्था ,गोडेगांव ता. बार्शी जिल्हा परिषद अहमदनगर, व पंचायत समिती पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.