श्रीरामपूर/ प्रतिनिधी :- लातूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील वडार समाजाच्या मुलीवर अत्याचार केलेल्या आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी उक्कलगावच्या वडार समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली आहे. या घटनेचा वडार समाजाच्यावतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावली सर्वश्री बापू मारूती धनवटे, जालिंदर म्हसू धनवटे, जालिदर जाधव, राजू धनवटे, किशोर धनवटे, गोरख धनवटे, ग्रा. पं. सदर-य रमेश धनवटे, अंबादास धनवटे, अशोक कुसळकर, लक्ष्मण लष्करे, नागनाथ धनवटे, संदीप मोडे, रावसाहेब धनवटे, अशोक जाधव, मोहन विटकर आदींसह वडार समाज बांधव मोठ्या संख्येचे उपस्थित होते.
‘टेंभुर्णी’ हत्याकांडातील आरोपींना अटक करा : वडार समाजाची मागणी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:59
Rating: 5