पुणे : दौंड येथे एकाच व्यक्तीने दोन ठिकाणी केलेल्या बेछूट गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगर मोरी चौक आणि बोरावके नगरमध्ये ही घटना घडली. आज दुपारी दोनच्या सुमारास एका माथेफिरुने सुरुवातीला नगर मोरी चौकात गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांच्या अंतराने त्याच व्यक्तीने बोरावके नगरमध्येही अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. गोळीबार करणारा माथेफिरु कोण आहे ? कोणत्या कारणामुळे त्याने हे कृत्य केलं? याचा पोलिस शोध घेत आहेत. परंतु या भागांमध्ये वाळूचा व्यवसाय चालतो. त्यामधील वादातून माथेफिरुने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अमोल जाधव, गोपाल शिंदे, प्रशांत पवार अशी या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गोळीबार करणारा दौंड येथील राज्य राखीव दलाचा पोलीस कर्मचारी असल्याची परिसरात चर्चा आहे.
बेछूट गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:51
Rating: 5