Breaking News

विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन


पुणे : विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे सकाळी 8.20 वाजताच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. फरांदे हे नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी युती सरकारच्या काळात विधानपरिषदेचे सभापती आणि उपसभापती पद भुषविले होते. फरांदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. भाजपचे नेते प्रमोद महाजन यांचा त्यांच्याशी स्नेह होता. संत वाङमयावरही त्यांचा मोठा अभ्यास होता. सध्या पुण्यातील एरंडवणा येथील हिमालय सोसायटीमध्ये ते वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 78 वर्षांचे होते. भाजपमधील हे जाणते व्यक्तिमत्व हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.