सर्वंकष आर्थिक विकासात देशात अग्रेसर राज्याचा मान महाराष्ट्राने मिळविला आहे. ‘ग्रोथ इनोव्हेशन लिडरशीप इंडेक्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया’ याबाबत फ्रोस्ट सॉलिव्हॅन या जागतिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनातून महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. देशातील 29 राज्यांचा 100 निर्देशांकांच्या माध्यमातून संशोधन करण्यात आले. फ्रोस्ट सॉलिव्हॅन संस्थेचे जागतिक अध्यक्ष अरुप झुत्शी यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला.