कर्मचार्यांचा किमान वेतनासाठी बुधवारी संप
सोलापूर : देशातील फेडरेशन व केंद्रीय कामगार संघटना यांनी विविध योजनांमधील सुमारे 1 कोटी कर्मचार्यांना 17 जानेवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. संपात योजना कर्मचारी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेतील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा-गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका-शिक्षिका, मध्यान्ह भोजन योजना सेविका, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प शिक्षक-कर्मचारी, मनरेगातील कामगार, विविध बचत गटात काम करणारे कामगार-कर्मचारी असे एकूण एक कोटी कर्मचारी संपावर जाणार आहेत.
सर्व योजनेत काम करण्यार्या कर्मचार्यांनी 17 जानेवारी रोजीचा लाक्षणिक संप यशस्वी करा, असे आवाहन सीटूचे राज्य सरचिटणीस अॅड. एम. एच. शेख यांनी केले आहे. देशात सत्ता परिवर्तन होताच लोकांच्या अपेक्षा वाढल्या. कल्याणकारी राज्यात सर्व देशबांधवांचे हित साधले जाईल, अशी जाहिरात करणारे मोदी सरकार कामगार-कर्मचार्यांबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.