Breaking News

शेडगाव येथील चावडीचे सागवान लाकडे सरपंचानी विकली

श्रीगोंदा/ प्रतिनिधी/- श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील सरपंचाने अधिकाराचा गैरवापर करून दलित वस्ती मधील जुन्या चावडीचे सागाचे साहित्य परस्पर विक्री केली आहे, याबाबत गावातील महेंद्र रणसिंग व अमोल झेंडे यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयाकडे तक्रारी अर्ज दिला आहे . 

याबाबत अधिक माहिती अशी कि शेडगाव येथे दलित वस्ती मध्ये समाजमंदिर (चावडी)होती. या चावडीचे बांधकाम हे दगडमाती मध्ये व छतावर पूर्णतः सागवानी लाकडाचे छत होते. पण या चावडीवरील लाकडाचे छत पूर्णतः काढून सरपंच विजय शेंडे यांनी सागवान लाकडाची कोणताही ठराव न घेता अथवा ग्रामस्थाना विचारात न घेता विक्री केली. तसेच यामध्ये मिळालेल्या मोठ्या रकमेचा घोळ केला आहे. 

त्याचबरोबर चावडीचे बांधकाम पडून दलित समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे सरपंच विजय शेंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी महेंद्र रणसिंग व अमोल झेंडे यांनी तक्रारी अर्जात केली आहे. या तक्रारीच्या प्रति जिल्हाधिकारी पोलीस उपाधीक्षक व गटविकास अधिकारी याना दिल्या आहेत.