Breaking News

गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणात सेल्फीच्या नादात दोघांचा मृत्यू


गोंदिया, दि. 27, जानेवारी - गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडोह धरणात आज दोघांचा सेल्फीच्या नादात बुडून मृत्यू झाला आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा गावातील पाच जण फिरण्याकरिता गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणात फिरायला आले. धरणात पाणी असल्यामुळे या मुलांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला. या पाचही मुलांनी सेल्फी काढण्याकरिता गेले असता धरणाच्या काठावरून दोन मुलांचा तोल धरणात गेल्याने दोघांचा मृत्यू झाला असून मृतांचे नाव रामदास गोटेफोडे व इजाज शेख असे आहे.