Breaking News

पायाभूत सुविधांच्या विकासाचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी जनतेला - एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 27, जानेवारी - ठाणे जिल्ह्यातील विकासाच्या नव्या संधींचा फायदा येथील ग्रामीण आणि शहरी जनतेला होणार आहे मग ते ग्रोथ सेंटर असेल किंवा बिझनेस हब,मेट ्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्य सेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल असे उद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.


भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी साकेत मैदान येथे मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण क रण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राज्य राखीव दलापासून, ठाणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस, कारागृह रक्षक, गृहरक्षक, कमांडो पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, दंगारोधक पथक अशा विविध पथकांचा समावेश होता. याप्रसंगी महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पोलीस आयुक्त परम वीर सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम, मनपा अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ
यावेळी बोलतांना पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील विविध योजना यशस्वीरित्या राबविल्याबध्दल जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, कृषी विभाग,पोलीस,आरोग्य यंत्रणा यांचे विशेष अभिनंदन केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना देखील कर्जमाफीचा लाभ झाला असून 50 कोटी 16 लाख रुपये शेतक र्‍यांच्या खात्यात जमा झाले आहेत.


सिंचन क्षमता वाढली
जलयुक्त शिवाराच्या या कामांमुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता सात हजार हेक्टरनं वाढली असून रब्बीच्या दुबार क्षेत्रात सुमारे साडे तीन हजार हेक्टरनं वाढ झाली आहे. जिल्ह्यात 4 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करण्यात आली असून प्रधानमंत्री आवास योजना तसंच, शबरी, रमाई या योजनांतर्गत परवडणारी घरं निर्माण क रण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असल्याबद्धल त्यांनी अभिनंदन केले.


गतिमान प्रशासनाचे उत्तम उदाहरण
ग्रामविकास आणि महसूल विभागानं शंभर टक्के अर्ज निकाली काढून गतिमान प्रशासनाचं उत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवलं आहे त्याचेही त्यांनी कौतुक केले. नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये 32 वर्क स्टेशन्स कार्यरत करण्यात आली असून ई-फेरफार, ऑनलाइन डाटा अपडेशन या सेवांमुळे शेतकरी आणि नाग रिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे असे ते म्हणाले.