Breaking News

पालघर जिल्ह्यात 5442 कुपोषित बालके


पालघर, दि. 27, जानेवारी - अदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांचा पालघर जिल्हा पुन्हा एकदा कुपोषणाच्या विळख्यात सापडताना पहायला मिळत आहे. डिसेंबर या एका महिन्यात तब्बल 878 कुपोषित बालकांच्या संखेत वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . या मध्ये 176 अति तीव्र कुपोषित तर 702 तीव्र इतकी मोठी कुपोषित बालकांच्या संखेत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात डिसेंबरमध्ये 675 अति तीव्र कुपोषित तर 4767 तीव्र कुपोषित अशी एकूण 5442 बालक असल्याची नोंद प्रशासना कडे झाली असून धक्कादायक बाब म्हणजे यातील 368 अति तीव्र कुपोषित आणी 2538 तीव्र कुपोषित अशी एकूण 2906 बालक सावरा यांच्या मतदार संघा (विक्रमगड ) तील आहेत . मागील वर्षी कुपोषणाच भीषण वास्तव समोर आल्यानंतर राज्य सरकारला खडबडून जाग आली. त्यानंतर राज्याच्या अनेक बड्या मंत्र्यांसह विरोधी पक्ष नेत्यांनी ही या कु पोषित भागाचे दौरे केले.आदिवासी विकास मंत्री यांनी तर कुपोषणावर मात करण्यासाठी डॉ. ए .पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ त्यांच्या मतदार संघातुन के ला. मात्र ही योजना कागदोपत्रिच असल्याचा आरोप जिल्ह्यातील सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. मागील वर्षी झालेल्या उपयोजनेनंतर कुपोषण काही प्रमाणात का होईना नियंत्रनात येईल अशी अपेक्षा येथील जनतेला होती. मात्र ही परिस्थिति आणखीन बिकट झाली असल्याच वास्तव या डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा समोर आले आहे.