Breaking News

अमृतांजन पुलाखाली कंटेनर पलटी, चालकाचा मृत्यू

पुणे, - मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर शनिवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. लोणावळ्यातील अमृतांजन पुलाखाली रात्री बाराच्या सुमारास कंटेनर पलटी झाल्याने हा अपघात झाला. यात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. लतीफ खाजामिया शेख (वय- 52 रा. मार्केट रोड, बालाजी मंदिराजवळ, मुकदमाबाद, नांदेड) असे मृत चालकाचे नाव आहे.


दरम्यान, अपघातानंतर कंटेनर बाजूला काढण्यात तासाभरात यश आले. मात्र, तरीही रात्री काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्यावरुन मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (ढड-16, णइ- 3326) लोणावळ्यातील अमृतांजन पुलाखाली आला असता वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर लागलीच पलटी झाला. कंटेनर थेट पुलाच्या पिलरवर आदळला यात केबिनचा चक्काचूर झाला. यात चालक लतीफ यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.