Breaking News

गोवंडी - चेंबूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा


मुंबई,  - हार्बर रेल्वे मार्गावरील गोवंडी आणि चेंबूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी वाहतूक सध्या बंद आहे. रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक देखील 15 मिनीटे उशीराने सुरु आहे.