बांधकाम विभागाचे उप अभियंता व्ही एस बेन्द्रे यांचे कारनामे.
कर्जत येथील पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. एस. बेन्द्रे हे कार्यालयासाठी असून अडचण नसून खोळंबा असे झाल्याचे पहावयास मिळत आहे. यांना काही आजार आहेत त्यामुळे त्याचे कामाकडे लक्ष लागत नाही. यातून बांधकाम विभागाचे अपेक्षित कामे होत नाही. काम न झाल्यास त्यांना जबाबदार धरले की त्यांना टेंशन येते व आजारी पडतात. या सर्व प्रकाराला कंटाळून कर्जत पंचायत समितीने त्यांचेकडील काही महत्वाची जबाबदारी शाखा अभियंता यांचेकडे दिली आहे. तरीही हे अधिकारी येणाऱ्या नागरिकाला, पदाधिकार्याना नीट बोलत नाहीत. सदरचे अधिकारी कित्येक दिवस कार्यालयात दिसतच नाहीत. आपल्याकडील कामाबाबत जबाबदार उत्तरे देत नाहीत त्यामुळे सर्वच जण यामुळे वैतागले असून यातून कसा मार्ग काढावा असा प्रश्न पडला आहे.
सदर अधिकारी यांच्या बेजबाबदार वक्तव्यानंतर ना.प्रा.राम शिंदे यांनी पंचायत समितीमध्ये घेतलेली आढावा बैठक आवरती घेतली होती. ही व्यक्ति आजारी असल्याचे भासवून कामात हलगर्जीपणा करत असताना त्यांचेवर कार्यवाही करायला कोणीही धजावत नाहीत. जर आपण काही बोललो व या व्यक्तिला काही झाले तर? अशी भीतीच अधिकारी व पदाधिकार्यांना वाटत असल्याने कोणीही याबाबत बोलत नाही. त्यामुळे त्यांचा समज आपलेच बरोबर आहे असा होऊन ते अधिकच मग्रुरीने वागत आहेत. त्यामुळे अशा अधिकार्याची मुख्य पदावरून सुट्टी करून या ठिकाणी चांगला अधिकारी द्यावा. अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनी केली आहे.
