Breaking News

राज्य सरकारच्या निषेधच्या घोषणा देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा


नेवासा/शहर प्रतिनिधी/ - देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या निषेधच्या घोषणा देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून विविध मागण्याचे तहसिलदारांना निवेदन दिले .अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ पेन्शन सह विविध मागण्यांच्या सोडवणुकीस केंद्र व राज्य सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ दि १७ जानेवारी रोजी देशभरातील अंगणवाडी कर्मचार्यांनी संप पुकारला. संपाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालया पासून तहसील कार्यालयावर मोर्चाने जावुन विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार प्रदीप पाठक यांना देण्यात आले.
निवेदनात इंडियन लेबर कॉन्फरंन्स शिफारशीची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी , आहार, पोषण व आरोग्य योजना मध्ये केलेली कपात मागे घ्यावी. येत्या आर्थिक बजेट मध्ये भरीव तरतूद करावी. मानधन वाढीचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्यात यावा. कर्मचाऱ्यां मध्ये प्रक्षोभ व संताप वाढु न देता मागण्याची समाधान कारक सोडवणुक करण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे.

संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. यावेळी सेवा जेष्ठतेनुसार मानधन वाढीची घोषणा ५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती.तब्बल तीन महिने उलटून गेले तरी त्या घोषणेचा शासन निर्णय झाला नसल्याने देशव्यापी संप पुकारण्यात आला असल्याचे माया जाजू व श्रीमती मन्नाबी शेख,अलका दरंदले, सुशीला गायकवाड,सविता दरंदले यांनी यावेळी बोलतांना आपल्या भाषणातून सांगितले. तसेच मानधनासंदर्भात योग्य पाऊले न उचलल्यास आंदोलन त्रिव करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी अंगणवाडी कर्मचारी रत्नमाला कोहक, नंदा राजगुरू, वैशाली हिवाळे, मिरा चव्हाण, केशर भागवत, तारा दळवी, अनिता गवळी, सुनीता घालमिले, श्रीमती मंगल भाकरे, हिरा देशमुख, माधुरी जामदार,उषा तुपे, कावेरी दारुंटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या