Breaking News

पारनेर आगारातील युवक कंडक्टरचा अपघाती मृत्यु


पारनेर/प्रतिनिधी /-महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पारनेर आगारातील कंडक्टर म्हणुन कार्यरत असलेले अजय रामकृष्ण गाडगे (वय 27, रा.म्हसणे. सुलतानपुर) या कंडक्टरचा रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता पारनेर विसापुर रो़डवरील म्हसणे या स्वतःच्या घरी जात असताना वडनेर फाट्याजवळ पुलानजिक एका अनोळखी वाहनाने जोराची धडक दिल्याने अजय गाडगे गंभीर जखमी झाला.
सुमारे एक तासाने अजय शुध्दीवर आल्यानंतर त्याने स़्वतःच्या मोबाईल वरुन मिञाला अपघाताची माहीती दिली. तात्काळ मिञ त्याठिकाणी पोहचले. त्यांनी या युवकाला जखमी अवस्थेत रुग्णवाहीकेत घेउन सुपा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या शरिराला गंभीर जखमा झाल्या होत्या. तसेच त्याला बरगडीला मार लागल्याने श्वास घ्यायला ञास होत होता. म्हणुन त्याला पुणे येथे हलविण्यात आले. त्या ठिकाणी दोन दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. पण गंभीर जखम व रक्तस्त्राव झाल्याने त्याची मंगळवार दि.16 जानेवारी रोजी प्राणज्योत मावळली. त्याबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.