Breaking News

पारनेर शहरात गणराज्य दिन उस्तहात साजरा.....


पारनेर / प्रतिनिधी ।शहरातील तहसिल कार्यालय येथे 69 वा राष्ट्रीय गणराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारनेरच्या तहसिलदार भारती सागरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन केले. या प्रसंगी नायब तहसिलदार दत्ताञय भावले, नायब तहसिलदार संजय माळी, पो.नि. हनुमंत गाडे, पो. उप. आर.डी. घुगे, सेनापती बापट विद्यालयाचे विद्यार्थी व शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचप्रमाणे शहरातील सेनापती बापट विद्यालय, न्यु इंग्लिश स्कुल, पारनेर महाविद्यालय, स्टेट बँक ऑफ इंडीया, पारनेर आगार, नगरपंचायत कार्यालय, पंचायत समिती, टेलिफोन. कार्यालय, आयटीआय पारनेर, पब्लीक स्कुल, किसान पब्लीक स्कुल, चाटे पब्लीक स्कुल, वीज वितरण कार्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, प्राथमिक मुलींची शाळा, प्राथमिक मुलांची शाळा,आदी ठिकाणी गणराज्य दिन साजरा करण्यात आला.