Breaking News

समाधी सोहळा उत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताह


कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज याच्या 180 व्या संजीवन समाधी सोहळा उत्सवानिमित्त कर्जत येथे अखंड हरीनाम सप्ताह व श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे आयोजित होणार्‍या या सोहळ्याचे हे 29 वे वर्ष आहे. त्यांच्या समाधी सोहळा दिनाचे औचित्य साधून दरवर्षी येथे हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते, सालाबादप्रमाणे दि. 27 जाने. पासून हा सप्ताह सुरु होऊन 4 फेब्रु. पर्यंत कीर्तनासह विविध कार्यक्रम याठिकाणी होणार आहे. यावर्षी रामायणाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये पहाटे काकडा भजन, सकाळी विष्णूसहस्त्रनाम व ज्ञानेश्‍वरी पारायण, गाथा भजन, आदी होणार असुन, दु. 2 ते 4 यावेळेत श्री संत गोदडमहाराज चरित्र वाचन, 4 वाजता हरिपाठ तर सायं 5 ते 8 श्रीराम कथा सादर केली जाणार आहे. रात्री 9 ते 11 कीर्तन व रात्री हरीजागर असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ह.भ.प. दत्तात्रय शिंदे व सुरेश खिस्ती यांनी दिली. ह.भ.प. गोंविंद महाराज शिंदे, ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर व ह.भ.प. प्रकाश महाराज जंजिरे याचे मार्गदर्शनाखाली कर्जत पंचक्रोशीतील भजनी मंडळ, ग्रामस्थ व श्री गोदड महाराज संस्थानचे पुजारी याचे वतीने होणार्‍या सप्ताहाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.