Breaking News

राहुरी तालुक्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

राहुरी / प्रतिनिधी :-  आरडगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच कर्णा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले, अध्यक्षस्थानी उपसरपंच सुनिल मोरे होते. कार्यक्रमास कैलास झुगे, बाळासाहेब धसाळ, रमेश झुगे, जालिंदर काळे, रविंद्र म्हसे, गंगाधर म्हसे , बाबासाहेब भांड, अंगणवाडी सेविका, प्रा. आ. कर्मचारी आदी ग्रामस्थ, महिला व पालक उपस्थित होते.

राहुरी नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या नवीन गावठान येथील नुतन मराठी शाळा नं. 5 मध्ये 69 वा भारतीय प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मुखतार सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येवुन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. अध्यक्षस्थानी तांदुळवाडीचे मा. उपसरपंच बाळासाहेब पेरणे होते.

प्रजासत्ताकदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षिका रूक्साना बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जेष्ट शिक्षक ना. म. साठे यांनी प्रजासत्ताकदिन व संविधानाविषयी विस्तृत माहिती दिली. विजय झडे, न. पा. शिक्षण मंडळाचे सदस्य भाऊसाहेब बिडवे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास बाळासाहेब धसाळ उपस्थित होते.सुञसंचालन मुख्यध्यापिका शिला खरात यांनी तर आभार अनिता पाडळे यांनी व्यक्त केले.


प्रसाद विद्यालयात भारतीय प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. राजेश पेरणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तांदुळवाडीच्या उपसरपंच आशा खडके होत्या. कार्यक्रमास सुर्यभान म्हसे, इंद्रभान पेरणे, सोमनाथ पेरणे, अण्णासाहेब धनवडे,  मुखतार सय्यद, बाळासाहेब पेरणे, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार आदी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

अष्टविनायक इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये 69 वा भारतीय प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्कूल कमिटी अध्यक्ष पत्रकार मुखतार सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येवुन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच बाळासाहेब पेरणे होते. प्रिन्सिपाल मोहनिराज होन यांनी प्रजासत्ताकदिन व संविधानाविषयी विस्तृत माहिती दिली.


तांदूळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेत प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रा. पं. सदस्य रामराव अंबादास पेरणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमास अभिजीत पेरणे, संभाजी धसाळ, नवनाथ निकम आदींसह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.