विरोलीला साठवण बंधा-याचे भूमिपुजन.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य काशीनाथजी दाते असणार आहेत. तसेच यावेळी शिवशाहीर ह.भ.प.कल्याण महाराज काळे यांचे 8.30 ते 10.30 वाजेपर्यंत समाज प्रबोधनात्मक व देशभक्तीपर हरी कीर्तनाचा होणार आहे. तर महाप्रसाद दुपारी होईल. या भूमिपुजन कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विरोली गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळ, व पिंपळेश्वर धर्मदाय संस्था यांनी केले आहे.