नेमणुकीसाठी बनावट दाखला सादर करून अंगणवाडी सेविकेकडून फसवणूक
रत्नागिरी, दि. 20, जानेवारी - पालगड (ता. दापोली) येथील अंगणवाडी सेविकापदाच्या नियुक्तीसाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला जोडून नोकरी मिळवून चार लाखाचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अंगणवाडी सेविका विनया जाधव यांच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालगड बाजारपेठेतील अंगणवाडीत कार्यरत असलेल्या विनया जाधव यांनी बनावट दस्ताऐवज तयार करून अंगणवाडी सेविकापदी नेमणूक मिळविली असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. विनया जाधव यांनी अंगणवाडी सेविका भरतीच्या वेळी नालासोपारा (पूर्व) येथील राजे शिवाजी विद्यालयाचा शाळा सोडल्याचा दाखला जोडला होता. तो राजा शिवाजी विद्यालयाकडे पडताळणीकरिता सादर केला होता. अहवालानुसार विनया विलास जाधव यांनी नेमणुकीवेळी सादर केलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शाळेचे नाव राजे शिवाजी विद्यालय असे आहे. प्रत्यक्षात शाळेचे नाव राजा शिवाजी विद्यालय असे आहे. तसेच शाळा सोडल्याची तारीख पाहता राजा शिवाजी विद्यालय ही शाळा तेव्हा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे त्या दाखल्याचा व शाळेचा परस्पर काहीही संबंध नाही असे संस्थेने त्यांच्या अहवालात नमूद केले होते.