महारेरामध्ये 15 हजारांहून अधिक प्रकल्प नोंदणीकृत; श्रेय क्रेडाईला
पुणे, दि. 20, जानेवारी - क्रेडाई महाराष्ट्र आणि ‘महारेरा’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून अल्पावधीतच ‘महारेरा’मध्ये 15 हजाराहून अधिक प्रकल्प नोंदणीकृत होऊ शकले. हा कायदा लागू होण्यापूर्वी व नंतर क्रेडाई महाराष्ट्रने विविध माध्यमातून ‘महारेरा’विषयी जागरूकता निर्माण केली, असे सांगत ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी ‘महारेरा’ नोंदणीचे संपूर्ण श्रेय क्रेडाई महाराष्ट्राला दिले.
क्रेडाई महाराष्ट्रच्या ‘नेतृत्व विकास’ या विषयावर आधारित भरविण्यात आलेल्या शिखर परिषदेचे आज नगरविकास विभागाचे संचालक एन. आर. शेंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी दुसर्या सत्रात ते बोलत होते. क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्राचे संस्थापक व माजी अध्यक्ष रामकुमार राठी यांच्यासह राज्याच्या 50हून अधिक शहरातून क्रेडाईचे पदाधिकारी व 200हून अधिक सदस्य यावेळी उपस्थित होते.
चॅटर्जी म्हणाले की, काही नोंदणीकृत प्रकल्पाच्या बाबतीत नियमांची पूर्तता होताना दिसत नाही. अशा व्यावसायिकांना महारेरामार्फत ई मेलद्वारे कळविले जात असले तरी क्रेडाईने देखील आपल्या माध्यमातून त्यांना जागरुक करावे, यासाठी संबंधित प्रकल्पाची आवश्यक ती माहिती पुरविण्याचे सहकार्य महारेराकडून केले जाईल.