Breaking News

थंडीमुळे तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू


लातूरमधील वाढत्या थंडीमुळे ऊसतोड कामगाराच्या तीन महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला. बाळू नामनौर असे ऊसतोड कामगाराचे नाव आहे. लातूर जिल्ह्यातील खलग्री शिवारात यवतमाळ जिल्ह्यातील ऊसतोडणीसाठी कामगार आले आहेत. त्यांनी राहण्यासाठी जिथे ऊसतोडणी सुरू आहे तिथे बाजूलाच राहण्यासाठी झोपडी तयार केली आहे. तेथे राहायला नीट आसरा न मिळाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.