Breaking News

कर्जत तालुक्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात


तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी ध्वजारोहण, संचलन तसेच इतर उपक्रमांनी प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात संस्थेचे विश्‍वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, पंचायत समिती सदस्य हेमंत मोरे, सरपंच स्वाती शेटे, प्राचार्य चंद्रकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते भा.कों. साळवे, आण्णासाहेब मोरे, मारुती सायकर, संजय शेटे, परिवर्तनच्या प्राचार्या नेहा जोशी आदी उपस्थित होते. डॉ. कुमार सप्तर्षी तसेच डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. खेडच्या जिल्हा परिषद शाळेत जि. प. सदस्य कांतीलाल घोडके, पं. स. सदस्य हेमंत मोरे यांनी ध्वजारोहण केले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच स्वाती शेटे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी उपसरपंच राजेंद्र मोरे, सेवा संस्थेचे चेअरमन शंकर मोरे, अमित मोरे, धनंजय मोरे, उदयसिंह मोरे, चौरंग मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उद्योजक मालोजी काकडे यांनी पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या योजनांची माहिती दिली. तर संदीप कदम यांनी सुत्रसंचालन केले. मिरजगावच्या जि. प. प्राथमिक शाळेत सरपंच नितिन खेतमाळस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जि. प. सदस्य गुलाबराव तनपुरे, उपसभापती प्रशांत बुद्धीवंत, उपसरपंच अमृत लिंगडे आदी उपस्थित होते, यावेळी नवनाथ धोंडे यांनी सुत्रसंचालन केले. कुळधरण येथील नुतन मराठी विद्यालयात जि. प. च्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.तसेच कुळधरण जि. प. शाळेत पोपट सुपेकर यांनी ध्वजारोहण केले. खैदानवाडी जि. प. शाळेत आखोनीच्या सरपंच दिपाली सायकर यांच्यासह वंदना सायकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी रंगनाथ सायकर व मुख्याध्यापक दत्तात्रय शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सुत्रांसंचालन नितीन गारुडकर यांनी केले.