Breaking News

पुनर्वसित शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा प्रकल्पग्रस्तांना मोबदला नाही; शेतकरी चिंतेत


प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये, तालुक्यातील पुनर्वसीत वाकी गावच्या शेतकर्‍यांच्या वाकी मध्यम प्रकल्पात संपादित केलेल्या शेतजमीनीचा मोबदला त्वरित न मिळाल्यास संरपच व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.देश स्वतंत्र झाला देशामध्ये घटनेप्रमाणे आणि संविधानाच्या नियमाप्रमाणे प्रजासत्ताक व्यवस्थेची अंमलबजावणी होऊन लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजेच स्वतंत्र भारताचे प्रजासत्ताक राज्य सुरू झाले, परंतु आजही राज्यातील ग्रामीण भागामध्ये खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक राज्याची संकल्पना पुरेपुर पोहचली नाही का ? अथवा याकडे अधिकार्‍यांचेे दुर्लक्ष आहे का असे प्रश्‍न पडतात, प्रजासत्ताक दिनानिमीत्त गावच्या कार्यक्रमात ग्रामस्थ संरपच, उपसंरपच, सदस्य व गावकर्‍यांचा चर्चात्मक आढावा घेतला असता, विकासाविषयी अनेक समस्या तसेच रस्त्यांची दुरावस्था, प्रकल्पात गेलेल्या शेतजमीनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत, शासनाच्या सातत्याने दुर्लक्षामुळे मुलभूत सुविधांपासून गाव वंचित, त्यामुळे खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक ही संकल्पना वाकी गावापर्यंत पोहचलीच नाही का असा प्रश्‍न शेतकर्‍यांमध्ये उपस्थित झाला आहे, येथील बागायत शेतीतील हजारो हेक्टर क्षेत्र खैरी मध्यमप्रकल्प या तलावाच्या लाभक्षेत्रात गेल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत, कित्येकांना स्थलांतर करावे लागले 35 वर्षांपूर्वी या गावचे पुनर्वसन शासनाच्या वतीने नियोजित जागी करण्यात आले, परंतु पुनर्वसीत गावाप्रमाणे तसेच शासन नियम आराखड्याप्रमाणे वाकी गावासाठी कुठल्याच प्राथमिक सेवा सुविधा सरकारच्या वतीने पुरवण्यात आल्या नाहीत, रस्ता, रूग्णालय, अथवा पुरेपूर वीज पुरवठा या सर्व प्राथमिक गरजा अल्प प्रमाणात असून संपादित केलेल्या शेतजमीनीचे मोबादले शेतकर्‍यांना आज तागायत मिळाले नाहीत, त्यासाठी शेतकर्‍यांनी केलेली न्यायाच्या लढाईस पुर्णतः शेतकर्‍यांच्या बाजूने झुकते माप दिलेले असताना देखील शेतकर्‍यांना शासनाकडून कुठलाच मोबदला मिळालेला नाही, यावेळी संरपच सुमन पवडमल, उपसरपंच कोळेकर यांसह ग्रामस्थ आपल्या मूलभूत हक्काच्या मागणी संदर्भात आक्रमक होऊन, प्रकल्पग्रस्तांना शेतजमीनीचा मोबदला त्वरीत न मिळाल्यास गावच्या संरपच सुमन पवडमल यांचे पती आण्णा पवडमल, उपसरपंच ब्रम्हदेव कोळेकर, चेअरमन आण्णा सावंत, काकासाहेब शेळके, उपेंद्र सावंत, प्रमोद निंबाळकर, दत्ता सावंत, यांसह वाकी ग्रामस्थांनी आंदोलन चा इशारा दिला आहे.