Breaking News

कुणकेश्‍वर मध्ये 26 जानेवारीला100 पतंग उडवणार


सिंधुदुर्ग, दि. 24, जानेवारी - सध्या महाराष्ट्रात मराठी शाळा पटसंख्ये अभावी बंद होत असताना जिल्हा परिषद केंद्रशाळा कुणकेश्‍वर नं. 1 मोठ्या दिमाखात आपले शतक महोत्सवी वर्ष साजरे करित आहे. वर्षभर विविध उपक्रम या निमीत्ताने राबविले जाणार असून याचाच एक भाग म्हणून येत्या 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ’’एकच जात, एकच धर्म’’ हा संदेश देण्यासाठी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
विरार सिवूड येथील दृष्टी इंटरप्रयजेस व केंद्रशाळा कुणकेश्‍वर नंबर 1 यांच्या सयूंक्त विद्यमाने केंद्रशाळा कुणकेश्‍वर नंबर 1 च्या शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त पतंगप्रेमींनी उपस्थित राहून शाळेच्या या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याध्यापक सौ. सुप्रिया सनये, शाळा व्यवस्थापन स मितीचे अध्यक्ष रामदास तेली, शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत बोंडाळे(लेपवरश्रश) यांनी केले आहे.