Breaking News

कर्जत मध्ये कडकडीत बंद ; दंगेखोरांवर कारवाईची मागणी

कर्जत /प्रतिनिधि/--भीमा कोरेगाव व वढू बुद्रुक, शिक्रापूर येथील दंगल घडविण्यात सम्पूर्ण मराठा समाज व ग्रामस्थ समाविष्ट होते. त्यामुळे सर्व दंगलखोरांवर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. या गावावर सामुदायिक दंड बसवून गावाचा सम्पूर्ण विकास निधी पुढील पाँच वर्षासाठी रोकण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन कर्जत येथे भीमसैनिकांनी कर्जत पोलीस स्टेशनला दिले.बुधवारी भीमा कोरेगाव येथील दंगलीचा निषेध करण्यासाठी बुधवारी कर्जत बंदचे आवाहन सकल मराठा समाज व भीम सैनिकांनी केले होते. 


त्यानुसार आज सकाळ पासूनच सर्व व्यवहार ठप्प होते. दवाखाना व मेडिकल या अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या होत्या. अनेक शाळानी ही आज सुट्टी दिली होती. आज सकाळी 11 वाजता कर्जत शहरातून भीमसैनिकांनी एकत्र येऊन कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. व वरील मागण्याचे निवेदन दिले या मध्ये भीमा कोरेगाव येथील दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी. सदर दंगल घडविनारे व सामाजिक तेढ निर्माण करणारे प्रमुख सूत्रधार मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी व वडू ब्रुद्रुकच्या महिला सरपंच यांचे वर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर सोमनाथ भैलुमे, सतीश आल्हाट, रोहन कदम, गोदड समुद्र, अंकुश भैलुमे, कुंदन भैलुमे, प्रवीण भैलुमे आदी सह अनेकांच्या सह्या आहेत.