Breaking News

भीमा कोरेगाव हल्ल्याच्या निषधार्थ नेवासा तालुक्यात स्वयंस्फूर्तीने बंद.


नेवासा/प्रतिनिधी/-भीमा कोरेगाव येथील झालेल्या हल्याच्या निषधार्थ नेवासा शहरासह परिसरात स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम, सलाबतपूर, शिरसगाव, गेवराई, कुकाणा, चांदा, घोडेगाव, सोनई, भेंडा, देवगाव, देडगाव, पाचेगाव, बेलपिंपळगाव या मोठ्या लोकसंख्या गावात ही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.नेवासा, सोनई, शनिशिंगणापूर, पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. स्वयंस्फूर्तीने झालेल्या बंद मध्ये सर्व सामान्य टपरीचालका पासून छोट्या व मोठ्या व्यावसायिक यांनी सहभाग नोंदविला होता.
महाराष्ट्र बंदच्या हाके अगोदर लोकशाही विचार मंचचे अध्यक्ष संजय सुखधान यांनी तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्या पासून तालुक्यातील जनतेला त्रास होऊ नये. म्हणून शांत रहाण्याचे व कोणतेही गैरकृत्य न करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे तालुक्यात ठीक -ठिकाणी आंबेडकरवाडी कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आंबेडकरवादी विविध संघटनांनी संयम दाखविल्यामुळे बुधवारी झालेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद जनता व व्यावसायिक यांनी दिला.

नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुमारे नव्वद गावांमध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी शांततापूर्ण वातावरणात बंद पाळण्यात येऊन विविध संघटनेच्या वतीने भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यात आले.