अमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला
हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या एहसान उर्फ खवैरीसह अनेक दहशतवाद्यांचा खात्मा
इस्लामाबाद/वृत्तसंस्था : अमेरिकेने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतावर बुधवारी ड्रोन हल्ले करत, हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या एहसान उर्फ खवैरीसह अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. अमेरिकेने दिलेले सल्ले आणि सूचनांनंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद केले नाही. यामुळे नाराज झालेल्या अमेरिकेने अखेर पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हांगु जिल्ह्यात ड्रोनद्वारे हल्ला केला. उत्तर वझिरीस्तानातील या हल्ल्यात हक्कानी संघटनेचा म्होरक्या एहसानसह तीन जण ठार झाले आहेत.
अफगाण शरणार्थींशी संबंधित एका घराला टार्गेट करुन हा हल्ला करण्यात आला होता. वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. दहशतवादविरोधी कारवाई कडक करण्यास अमेरिकेने पाकला बजावले होते. मात्र कुठलीही कारवाई न केल्यामुळे वॉशिंग्टनहून पाकिस्तानला होणारी लष्करी आणि आर्थिक मदत रोखली होती. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका हॉटेलवर रविवारी तालिबानी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने कडक पावले उचलली. पाकिस्तानच्या क्षेत्रात लपलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना अटक करा किंवा देशातून बाहेर काढा, अशी चेतावनी अमेरिकेने दिली होती.
अहवालानुसार, ड्रोनच्या माध्यमातून दोन क्षेपणास्त्र दहशतवादी ठिकाणांवर डागण्यात आले होते. या हल्ल्यात हक्कानीचा कमांडर अहसन अका खोरे हा मारला गेला आहे.
ताजा ड्रोन हल्ला हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमाभागातील शानकिला भागात झाला आहे. यापूर्वी केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली होता. यापूर्वी 17 जानेवारी रोजी देखील अफगाणिस्तानात अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला होता. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले होते. हा हल्ला ज्या ठिकाणी करण्यात आला होता, ते ठिकाण पाकिस्तानी सीमेपासून जवळच आहे.