राष्ट्रीय सेवा योजनेचा समारोप
यावेळी बोलताना मारूती सायकर म्हणाले की ,कॉलेज जीवनाबरोबरच विद्यार्थ्यांना सामाजिक ज्ञान व्हावे. यासाठी शिबिराची आवश्यकता असुन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्रश्न समजण्यास यातुन मदत होते. विद्यार्थ्यांनी चांगले विचार जोपासल्यास त्यातुन सामाजिक परिवर्तन होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी प्रा. शाहूराव पवार यांनी शिबीरार्थींनी दिवसात केलेल्या कामाची माहिती दिली. शिबिरासाठी प्रा.संतोष साबळे, प्रा.कुंडलिक बोडरे, प्रा.शिवगुरु व्हंडकर, प्रा.विनायक हिरे, प्रा.मनिषा लगड, प्रा.सुनंदा मोरे, ग्रंथपाल प्रा.सचिन शेलार, प्रा.विवेक साळवे, विद्यार्थी प्रतिनिधी राहुल शेटे, रूपाली वाघमारे तसेच प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ एस.डी.मांजरडेकर यांनी केले.प्रा.संदीप काळे यांनी आभार मानले.
