चाइल्ड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली सुवर्णपदकाची लयलूट
या परिक्षेत अनुजा सोनवणे, सार्थक गणगे, आयुष कडू, अभिषेक वाबळे, धनंजय आंबेकर, भक्ती शिंदे, उदय मते, शुभम ढगे यांनी विभागीय स्तरावर सुवर्णपदक मिळवले. तर राष्ट्रीय स्तरावर श्वेता गणगे, सार्थक आदमने, तनवी पंडित, आर्यन भालेकर, गौरी मगर, शेजल जगदाळे, सार्थक वाघुले, श्रेया वाकचौरे, आर्षद पठाण, अथर्व वाबळे, ऋतुराज डांगे, श्रीराज मते यांनी सुवर्णपदक मिळवले. तर शालेय स्तरावर रुद्र शेळके, समर्थ ढगे, अर्पिता पंडित, सोहम शिंदे यांनी सुवर्णपदक मिळवले.
राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून इतर विद्यार्थ्यानाही यामुळे प्रेरणा मिळणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या व या विद्यार्थ्यांच्या कष्टाचे हे फळ आहे असे वक्तव्य शाळेचे संस्थापक प्रा. सागर बनसोडे यांनी केले. या विद्यार्थ्यांना शाहरुख सय्यद , संदिप खाटिक, शुभांगी काळे, कविता लेंभे , लक्ष्मण मुंगसे यांचे मार्गदर्शन लाभले.मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक प्रा. सागर बनसोडे, विश्वस्त अंबादास गोरे यांनी अभिनंदन केले आहे.
